Solapur : The Kashmir Files सिनेमानंतर धर्माच्या नावाखाली चिथावणीखोर भाषण!
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र गुण्यागोविंदयानं गुढीपाडवा साजरा करतोय.. तर सोलापुरात काही नाठाळ मंडळी धर्माच्या नावाखाली जनतेची माथी भडकवण्याचं काम करत असल्याचं समोर आलंय. सोलापुरात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हिंदू राष्ट्रसेनेचे पदाधिकारी धार्मिक तेढ निर्माण करणारं भाषण ठोकताना दिसताहेत.. सोलापुरात गुरुवारी खास महिलांसाठी काश्मीर फाईल्स चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता... सिनेमा संपल्यानंतर थिएटरच्या बाहेर महिलांना उद्देशून केलेल्या भाषणात, मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्यासाठी दबाव टाकला जातोय... रवी घोणे आणि आनंद मुसळे अशी चिथावणीखोर भाषण करणाऱ्यांची नावं असल्याची माहिती मिळतेय.
Tags :
Abp Majha Solapur ABP Maza ABP Majha Kashmir Files Solapur Kashmir Files Solapur Hindu Muslim