Special Report Solapur Politics: मी नव्हे, माझा नातू येईल; सोलापूरच्या राजकारणात कलगीतुरा
Continues below advertisement
सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 'मीच काय, माझा छोटा नातूही मोहोळ-नरखेडला येईल,' अशा शब्दात राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिवाळीपूर्वी पक्षप्रवेशाचा मोठा धमाका होईल असे म्हटले आहे, ज्यात जिल्ह्यातील पाच माजी आमदारांचा समावेश असू शकतो. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे महायुतीत मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement