Lockdown | सोलापुरात शेतात सुरु असलेल्या बर्थडे पार्टीवर पोलिसांची धाड, 11 अटकेत

सोलापुरातील कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतात सुरु असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. शिवारात जुगार खेळताना तसेच दारु पिणारे 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणाहून 13 मोटरसायकल, 1 ऑटो रिक्षा तसेच दारुच्या बॉटलही जप्त करण्यात आल्या आहेत.
11 आरोपींविरोधात भादवि 269, 270, 188, 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 11 आरोपींना अटक केली असून 4 जण फरार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola