Solapur :सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या कांदा लिलाव बंद राहण्याची शक्यता
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांची विक्रमी आवक सुरु आहे. बाजारात आज तब्बल 800 ट्रक कांंद्याची आवक झाली आहे. दोन दिवसांपूर्वीही बाजारात 800 ट्रक कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. कांद्याची विक्रमी आवक झाल्यामुळे दर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन दिवस लिलाव बंद ठेवण्याता आला होता. दरम्यान आजही विक्रमी आवक झाल्यामुळे उद्याही कांदा लिलाव बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे... यासाठी आज कांदा व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीत लिलाव बंद ठेवायचा की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे...