Coronavirus | सोलापुरात अवघ्या 22 दिवसाच्या चिमुकलीची कोरोनावर मात
Continues below advertisement
काल सोलापुरातील अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीने कोरोनवर मात केली आहे. 26 एप्रिल रोजी या मुलीचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जन्म झाला होता. घरी गेल्यानंतर बाधितांच्या संपर्कात आल्याने या चिमुकलीची आई आणि चिमकुलीस कोरोनाची लागण झाली. अवघ्या 11 दिवसाची असताना या मुलीस शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र योग्य उपचार मिळाल्याने 11 व्या दिवशी चिमुकली कोरोनामुक्त झाली. 22 दिवसाच्या ही चिमकुली आणि तिची आई या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने काल रुग्णालयातुन सोडण्यात आले.
Continues below advertisement