Solapur Protest : सोलापुरात लॉकडाऊन विरोधात व्यापाऱ्यांचं उपोषण
सोलापुरात लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केलीय. माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांनी उपोषण पुकारलं आहे. व्यापारी मृत्यूशय्येवर आहे हे दाखवण्यासाठी एका व्यापाऱ्याला प्रतिकात्मकरित्या सलाईन लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जातोय. सोलापूर शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असताना देखील केवळ नियमांमुळे प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये कोणतेही शिथिलता दिलेली नाहीये. 2011 च्या जणगणेनुसार सोलापूर शहराची लोखसंख्या ही 10 लाखाहून कमी आहे. त्यामुळे पालिकेला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार नाहीयेत असा दावा करत पालिकेने ग्रामीण भागातील आदेशच शहरात ही लागू केलेत. वास्तविकत: सोलापूर शहराची लोकसंख्या सध्या 10 लाखाहून अधिक आहे. तसेच शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ 2 ते 3 टक्के आहे. तसेच शहरात 55 टक्के ऑक्सिजन बेड देखील शिल्लक आहेत. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र निर्णय काढून शहरातील निर्बंध शिथील करत व्यापार सुरु करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे. या उपोषणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी