Workplace Harassment: 'माझ्या शरीरावर हात लावणं', Solapur मधील Kist Finance च्या महिला कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप

Continues below advertisement
सोलापूरमधील (Solapur) किस्त फायनान्स कंपनीत (Kist Finance Company) धक्कादायक प्रकार समोर आला असून, बेकायदेशीर कर्ज (Illegal Loan) मंजूर करण्यास नकार दिल्याने एका महिला कर्मचाऱ्याचा (Female Employee) शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप आहे. 'येता जाता मला ट्रॉन्ट मारणं, घाणेरड्या गोष्टी बोलणं आणि माझ्या शरीरावर हात लावणं', असा गंभीर आरोप पीडित महिला कर्मचाऱ्याने केला आहे. या प्रकरणी कंपनीच्या ब्रांच मॅनेजरसह (Branch Manager) एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीची दखल न घेतल्याने एचआर विभागावरही (HR Department) कारवाई झाली आहे. धक्कादायक म्हणजे, १४ कर्मचारी असलेल्या या शाखेत पीडिता एकमेव महिला होती आणि तिच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचीही सोय नव्हती, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola