Jay Siddheshwar Maharaj | सोलापूरच्या खासदारांचा जातीचा दाखला हरवला, पोलिसात तक्रार दाखल! | ABP Majha
सोलापूर जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता आणखी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपला जातीचा दाखला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. 14 फेब्रुवारी रोजी खासदारांनीच ही तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजीच सोलापुर जात पडताळणी समितीच्या कार्यालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु असताना दाखला उच्च न्यायलयात असल्याची माहिती खासदारांच्या वकीलांनी दिली होती. त्यामुळे दाखला नेमकं आहे तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.