Solapur Rain | सोलापुरात मुसळधार, वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा अजून शोध सुरु

सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील नाल्यातून वाहून गेलेल्या रिक्षाचालक सतीश शिंदे यांचा अजूनही शोध लागलेला नाही. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सतीश शिंदे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. या घटनेला आता जवळपास ५६ तास उलटून गेले आहेत, तरीही सतीश शिंदे बेपत्ता आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने सतीश शिंदे यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. सतीश शिंदे वाहून गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक ते मडकी वस्ती रोडवरील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून शोधमोहीम सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola