Jaysingh Mohite Patil | आधी अजित पवारांवर कारवाई करा, जयसिंह मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल | ABP Majha
Continues below advertisement
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जिल्हा परिषद सदस्यांचं निलंबन केल्यानंतर मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा, अशी टीका करत जयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या कारवाईला उत्तर दिलं आहे. पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांवर कोणती कारवाई केली? अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष होताना कोणती कारवाई झाली? दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कोणती कारवाई केली, असा सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement