Solapur Murder | वडिलांनी सुपारी देऊन स्वत:च्याच मुलाची हत्या केली, सोलापुरातील धक्कादायक घटना
घरात त्रास देणाऱ्या या मुलाची सुपारी घेऊन वडिलांनीच काटा काढल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. 29 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास सोलापुरातील कुंभारी हद्दीत पोलिसांना बेशुद्धावस्थेत एक तरुण आढळला. त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शैलेश सुरेश घोडके असे या तरुणाचे नाव आहे.