Solapur : घरावर तिरंगा लावताना सोलापुरात एक युवक जखमी तर पालघरमध्ये एकाने गमावला जीव

देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर झेंडा लावण्याचा उपक्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे... पण यात दोन दुर्दैवी घटना सोलापूर आणि पालघरमध्ये घडल्यात... पालघरमधील जव्हारमधील राजेवाडी यागावात 65 वर्षीय लक्ष्मण शिंदे यांचा घरावर झेंडा लावण्यासाठी चढले असताना घराचे कौल फुटले आणि पडल्यानं गंभीर दुखापत झाली... आणि त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे सोलापुरातल्या मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथे घरावर झेंडा लावताना पाय घसरुन पडल्यानं तरुण जखमी झाला. देशभरात 75व्या अमृतमहोत्सवाचा जल्लोष आहे... पण उत्साहाच्या नादात कोणतीही दुखापत होऊ नये आणि काळजी घेऊनचं आपल्या घरावर तिंरगा लावावा... असं आवाहन एबीपी माझाही करतंय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola