Solapur BJP Rift : 'हे गुप्तचर आहेत, परत गठ्ठ्यात घेऊन जातील', Subhash Deshmukh यांचा पक्षप्रवेशावर थेट हल्ला

Continues below advertisement
सोलापूर भाजपामधील (Solapur BJP) अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या (Jaykumar Gore) पुढाकाराने सुरु असलेल्या 'मिशन लोटस'मुळे (Mission Lotus) पक्षात इनकमिंगवरून जुने विरुद्ध नवे असा वाद पेटला आहे. 'हे मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीनं आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठ्यात घेऊन जाण्याची भीती आहे,' असा खळबळजनक आरोप आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) आणि इतर चार माजी आमदारांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला देशमुख गटाने तीव्र विरोध केला आहे. देशमुख समर्थकांनी भाजपच्याच कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. या पाचपैकी तीन माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) असल्याने, डॅमेज कंट्रोलसाठी राष्ट्रवादीनेही दत्ता भरणेंना (Dattatray Bharane) मैदानात उतरवले आहे. आगामी निवडणुकांपूर्वीचा हा अंतर्गत वाद भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola