Web Exclusives | पुन्हा लॉकडाऊन नकोच! सोलापुरातील विडी कामगारांची व्यथा
सोलापुरातील सामन्यांच्या, कामगारांच्या व्यथा जाणून घेत असताना आम्ही पोहोचलो विडी कामगारांच्या वसाहतीत. याच वसाहतीत मारुती किराणा दुकान आहे. किराणा दुकान तसं अत्यावश्यक सेवेत. लॉकडाउन झालं तरी दुकान सुरू ठेवता येईल. मात्र ग्राहकांकडे पैसाच नसेल तर व्यापार कसा चालवायचं असा प्रश्न पडलाय. याच कारणामुळे उधारी वर व्यवसाय चालवाव लागतोय. आणि 10 बाय 10 च्या खोलीत असलेल्या एवढ्याशा दुकानात देखील लाखहुन अधिक रुपयांची उधारी आहे. स्वतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या असून शासनाने आमच्यासाठी काहिच केलं नाही असा आरोप या महिलेचा आहे. दैनंदिन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहे. खाद्य तेलापासून सर्वच गोष्टी महागक्या आहेत. अशात लॉकडाउन झालं तर परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नकोच अशी भावना किराणा दुकानदारांची आहे.