दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी येथील गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली आहे. मतिमंद मुलांच्या या निवासी विद्यालयात जवळपास 69 जण शिकण्यासाठी आहेत. त्यातील तब्बल 43 विद्यार्थी एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.