Solapur Akkalkot Swami: अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचं रुपडं पालटणार, असं असणार नवं मंदिर ABP Majha
सोलापुरातील अक्कलकोटचं स्वामी समर्थ मंदिराचं गेल्या काही दिवसांपासून नुतनीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे... काम पूर्ण झाल्यानंतर गाभाऱ्यासह संपूर्ण सभा मंडपाचं रुपडंं पालटणार आहे.. यातील विशेष बाब म्हणजे स्वामींच्या मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.. मंदिराच्या कामासाठी खास राजस्थानहून पांढरे शुभ्र मार्बल मागवण्यात आल्या आहेत. तर, काही खास कारागीर आपल्या हाताने मंदिराला सजवण्याचं काम करत आहेत.. लवकरच या मंदिराचं काम पूर्ण होणार असून भाविकांना मंदिर परिसरात अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत...
Tags :
Rajasthan Solapur Akkalkot Renovation Swami Samarth Temple Gay Beautification Rupadam Installation White White Marble