Onion Price Falls | सोलापुरात कांद्याच्या दरात घसरण, इजिप्तचा कांदाही दाखल
सोलापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून दररोज कांद्याच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे स्थानिक कांद्याच्या दरात घसरण होत आहे तर दुसरीकडे सांगली आणि सोलापूरच्या बाजारात तुर्की आणि इजिप्तचा कांदा देखील दाखल झाला आहे.