Leopard Attack | बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुराच्या 8 वर्षीय मुलीचा मृत्यू
बिबट्याच्या हल्ल्यात उस तोडणी मजूराच्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात ही घटना घडली आहे. बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी शार्पशूटरही दाखल झाले आहेत. बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाने आदेश दिले होते. त्यानंतर त्या ठिकाणी शार्पशूटर दाखल झाले आहेत. परंतु, शार्पशूटर गावात दाखल होण्यापूर्वीच बिबट्यानं आठ वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे.