Goa : कोल्हापूरच्या मुलांची गोव्यात लूट, चंदगडच्या समाजसेवकांनी घेतली Pramod Sawant यांची भेट

Continues below advertisement

कोल्हापुरातील चंदगडमधील समाजसेवक संतोष माळवीकर, शिवाजी पाटील, लक्ष्मण गावडे आणि इतरांनी गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली..  या भेटीचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी चंदगडमधील मुलं गोव्यावरुन परत येत असताना या मुलांना  स्वस्त जेवणाच्या नावाखाली  एक टोळी हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि तिथे या तरुणांना कोंडलं आणि बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील ऐवज लुटला होता. या प्रकरणाचा व्हिडीओ चंदगडमधील समाजसेवक संतोष माळवीकर यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला आणि या पिडीत मुलांना घेऊन थेट गोवा गाठलं. गोवा पोलीसांना याची तक्रार दिल्यानंतर म्हापसा पोलिसांनी टोळीत सहभागी असलेल्या तिघांना अटक केली. या टोळीतील आणखी काही जणांचा शोध पोलीस करत आहेत. या टोळीने यापूर्वीही अनेकांना अशाच प्रकारे लुटल्याचं समजतयं. यामुळे या समाजसेवकांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली . यांसदर्भात मोठी चौकशी लावण्याचे आश्वासन प्रमोद सावंत यांनी दिलंय. तसच गोव्यातील सर्व पब, हॉटेल याची चौकशी सुरु करुन बेकायदेशीर असलेले व्यवसाय बंद करु असेही आश्वासन दिलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram