Social media influencers :सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी नियमावली,उल्लघंन केल्यास 50 लाखांचा दंड
Continues below advertisement
सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांना 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या पद्धतीने सशुल्क सामग्रीचा प्रचार केल्यास 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.
Continues below advertisement