गोंदियात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी नियम मोडले, खरेदीसाठी गर्दी
Continues below advertisement
राज्य सरकारच्या निकषाप्रमाणे गोंदिया जिल्हा लेव्हल 1 मध्ये आल्याने आज पासून गोंदिया जिल्यात अनलॉक करण्यात आला असून पहिल्याच दिवशी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून अनेक दुकानांत एकाच वेळेला ग्राहक आल्याने सोशल डिस्टेन्सिगचा फजा उडाला. तर अनेक लोक रस्त्यावर बिना मास्क फिरताना दिसले. तर दुसरीकडे दारुची दुकानं मात्र अजूनही बंद असून फक्त पार्सल सुविधा असल्याने मद्यप्रेमींची निराशा झाली आहे.
Continues below advertisement