Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप
Continues below advertisement
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्यावर पोलीस पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे. 'फडणवीसांच्या सांगण्यावरून आयुक्त पाळत ठेवतायत का?', असा थेट सवाल लोंढे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला आहे. मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनचे कर्मचारी सपकाळ यांच्या घरात परवानगीशिवाय घुसले आणि त्यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचून चौकशी केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही तिसरी वेळ असून, माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे, असा जाब सपकाळ विचारत आहेत. यापूर्वी नितीन गडकरी आणि जितेंद्र आव्हाडांवरही अशीच पाळत ठेवण्यात आली होती, असा दावाही लोंढे यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement