Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा रविवारी सांगलीत संपन्न होणार होता. काल रात्री तिचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. यानंतर आज दुपारी तिचा लग्नसोहळा संपन्न होणार होता. परंतु, या लग्नसोहळ्यापूर्वी स्मृती मानधना हिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्मृती मानधना हिच्या वडिलांना तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अचानक अॅम्ब्युलन्स आली अन् खळबळ उडाली
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभादरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती अचानक खालावली, ज्यामुळे पाहुणे आणि कुटुंबीयांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी म्हणून रुग्णवाहिका विवाहस्थळी बोलावण्यात आली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर विवाहस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, सध्या स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.