ABP News

Smita Wagh on Lok Sabha : उमेदवारी दिल्याबद्दल आभार, निवडणुकीत माझा विजय पक्का : स्मिता वाघ

Continues below advertisement

Smita Wagh on Lok Sabha : उमेदवारी दिल्याबद्दल आभार, निवडणुकीत माझा विजय पक्का : स्मिता वाघ

आपल्याला मिळालेल्या उमेदवारी बद्दल स्मिता वाघ यांनी आपल्या पक्ष श्रेष्ठी यांचं आभार मानले आहे. मागील काळात  तिकीट कापले गेले असले तरी कार्यकर्त्यांची भूमिका ही पक्षाशी एक निश्ट राहून पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडली पाहिजे अशी असायला पाहिजे या भूमिकेतून आपण पक्षाचे काम करत राहिलो,पाच वर्ष आपण आपल्या परीने शंभर टक्के काम करत राहिलो  आणि त्याचाच हा परिणाम आहे अस मला वाटत असल्याचं जळगाव लोकसभा मतदार संघाच्या भाजपा च्या उमेदवार स्मिता वाघ यांनी म्हटल आहे. आपण कधीही तिकीट मिळण्यासाठी काम केले नाही ,केवळ पक्षाच्या झेंद्या खाली काम करण्याची भूमिका आपली राहिली आहे आणि मरे पर्यंत आपण पक्षाच्या झेंड्या सोबत राहणार आहोत त्यामुळे तिकीट मिळाले काय आणि नाही मिळाले काय नाराज होण्याचा काही प्रश्नच नव्हता,आपले पती निधन झाले त्याला अनेक कारणे असली तरी या काळात माझ्या पाठी मागे पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सोबत राहिले आहेत त्यामुळे आपण पुन्हा उभे राहू शकलो आहोत. आपण प्रत्येक वेळी संयम ठेऊन काम केले आणि आपला संयम आपल्याला उपयोगात आला आहे त्याच बरोबर तळागाळातील कार्यकर्त्याला संधी देण्याची पक्षाची भूमिका राहिली आहे त्याच माध्यमातून आपल्याला आज उमेदवारी मिळाली आहे. उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेले असले तरी ते नाराज होणार नाहीत असे मला वाटते,कारण ज्या वेळी माझे तिकीट कापले गेले आणि त्यांना देण्यात आले होते ,त्यावेळी आपणही त्यांच्या पाठीमागे  उभे राहिलो होतो,विरोधक कोणीही असले तरी जळगाव लोकसभा निवडणुकीत आपली जागा निवडून येईल असा विश्वास स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram