Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 25 जानेवारी 2022 : मंगळवार : ABP Majha

Continues below advertisement

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो... 

1. ओमायक्रॉनमुळं बंद झालेल्या शाळा आजपासून सुरु होणार, पालकांच्या भूमिकेकडे लक्ष, तर १४ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू न करण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय,
 
2. मी देखील गुन्हेगार...निवडणुकीत कमी पडल्याची कबुली देताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य; भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसप्रमाणे रिंगणात उतरण्याचा शिवसेना नेत्यांना सल्ला
 
3. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याचं आव्हान, दुपारी साडे तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
 
4. नाना पटोलेंकडून मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच, भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पुतळ्याचं दहन
 
5. पाकिस्तानातून मुंबईत धडकलेलं धुळीचं वादळ कोकणात धडकणार, ताशी 20 ते 30 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज 

6. राज्यातील कमाल तापमानात मोठी घट, मुंबईसह राज्यभरात गारवा वाढला, पुढील 2-3 दिवस चित्र कायम राहणार
 
7. मोठ्या शहरांत झपाट्यानं पसरणारा ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर, ‘इन्साकॉग’चा इशारा, बीए.टू व्हेरियन्टचाही भारतात शिरकाव
 
8.  एबीपी माझाचा सर्वात मोठा इम्पॅक्ट, रणजीतसिंह डिसले गुरुजींना अखेर रजा मंजूर, अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा
 
9. वीज कापण्याशिवाय आता पर्याय नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाणीपुरवठा विभागासह विविध विभागांकडे 8 हजार 924 कोटींची थकबाकी.

10. चित्तथरारक सामन्यात भारत चार धावांनी पराभूत, एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावली, आफ्रिकेकडून क्लिनस्वीप

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram