Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 21 जानेवारी 2022 : शुक्रवार : ABP Majha

Continues below advertisement

 

1. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु असतानाही कॉलेज सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, तर सोमवारपासून राज्यभरातल्या शाळा सुरु होणार

2.  पाच वर्षांखालील मुलांना मास्क बंधनकारक नाही, आरोग्य मंत्रालयाची नवीन नियमावली, 6 ते 11 वयोगटातील मुलांना पालकांच्या निगराणीखाली मास्कचा वापर करण्याच्या सूचना

3. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, 'Why I Killed Gandhi' चित्रपटावरुन वादाची शक्यता, 2017 मधील चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

4. अभिनेता किरण माने आणि स्टार प्रवाहमधला वाद मिटवण्यासाठी राजकीय मध्यस्थी, मानेंसह वाहिनीचे प्रमुख सतीश राजवाडे जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला, वादावर तोडगा निघण्याची शक्यता

5. मुंबईकरांपाठोपाठ ठाणेकरांनाही दिलासा, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा लवकरच निर्णय, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

6. रुग्णालयातील महिला सफाई कामागारानं चुकीचं इंजेक्शन दिल्यानं बाळ दगावलं, मुंबईतल्या शिवाजी नगरमधल्या नूर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा

7. भाजपनं पणजीतून तिकीट नाकारल्यानंतर पर्रिकरांचे पुत्र उत्त्पल अपक्ष लढण्याची शक्यता, तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरही बंडाच्या पवित्र्यात

8. हिंदू वारसाहक्क कायदा येण्यापूर्वीच्या प्रकरणातही महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

9. 23 ऑक्टोबरला क्रिकेटच्या मैदानावर हायव्होल्टेज सामना, टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

10. टीम इंडियासमोर एकदिवसीय मालिका वाचवण्याचं आव्हान, दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram