Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 19 जानेवारी 2022 : बुधवार : ABP Majha

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो... 

  1. ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांचा आज निकाल, प्रत्येक जिल्ह्यातून एबीपी माझाचं लाईव्ह कव्हरेज
  2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
  3. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत राज्यभरातल्या शाळा सुरु करण्याबाबत चर्चा; टास्क फोर्सचाही हिरवा कंदील, बीडमध्ये शाळा सुरु करण्याबाबत पालकांचं आंदोलन
  4. मुंबईतील नेव्हल डॉकमध्ये INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, 3 जवान शहीद तर 11 जण गंभीर जखमी
  5. भंडारा पोलिसांनी गावगुंड मोदीला पकडल्याचा नाना पटोलेंचा दावा, मात्र कुणालाही अटक केली नसल्याची भंडारा पोलिसांची माहिती
  6. नागपुरात जुगारामुळं कुटुंबाची राखरांगोळी, आर्थिक विवंचनेत सापडल्यानंतर पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन कुटुंबप्रमुखांची आत्महत्या
  7. राज्यात मंगळवारी 39 हजार 207 कोरोनाबाधितांची नोंद तर 53 जणांचा मृत्यू
  8. रेल्वे रुळाशेजारची अनधिकृत घर रिकामी करण्यासाठी 7 दिवसांची मुदत, मात्र मध्य रेल्वेच्या नोटीशीला मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोध
  9. जादूटोण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने पार्टनर व्यावसायिकाला 48 लाखांना लुटलं, व्यावसायिकाचा मृत्यू, विरारमधील धक्कादायक प्रकार
  10. दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी के.ए. राहुलच्या नेतृत्त्वात टीम इंडिया मैदानावर उतरणार, कसोटी मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola