Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 फेब्रुवारी 2021 | गुरुवार | एबीपी माझा

Continues below advertisement

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाप्रकरणी अटकेत असलेल्या रोना विल्सनला अमेरिकन एजन्सीची क्लीनचिट, कटाचं कथित पत्र लॅपटॉपमध्ये प्लॅन्ट केल्याचा खळबळजनक दावा

2. पश्चिम महाराष्ट्रातील 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार, 10 महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांना शॉक, 3 आठवड्यात कारवाई होणार

3. ऊर्जा विभागातील भरतीचा मार्ग मोकळा, SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आता EWS चा लाभ मिळणार, अभियंतापदासाठी जाहिरात प्रसिद्ध

4. शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करणार, 18 फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको, संयुक्त किसान मोर्चाची घोषणा

5. लडाख सीमेवरुन सैन्य मागे घेण्यास भारत आणि चीनची सहमती, चर्चेची नववी फेरी यशस्वी झाल्याचा चीनच्या संरक्षणमंत्रालयाचा दावा, तर राजनाथ सिंह आज निवेदन देण्याची शक्यता

6. उत्तराखंडमध्ये तपोवन बोगद्यात अडकलेल्या ३९ मजुरांच्या सुटकेसाठी लष्कराने बदलली रणनीती, बोगद्यात ड्रील करुन मजुरांना वाचवण्याचे प्रयत्न

7. सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या अकाऊंट्सवर कारवाई करा, केंद्र सरकारच्या ट्विटरला सूचना

8. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा प्रकार समोर, एस्ट्राजेनेका लसीच्या वापर करण्याची WHO ला शिफारस

9. मुंबईतल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी आज म्हाडाची लॉटरी, ना.म. जोशी मार्गावरील 300 घरांसाठी सोडत, गृहनिर्माण मंत्र्यांची माहिती

10. बुलढाण्यात तरुणांनी तलवारी नाचवल्या, मलकापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष हाजी राशिद खाँ यांच्या वाढदिवसातील प्रकार, व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram