Kolhapur News : महिला सुधारगृहमध्ये 6 नृत्यांगनांकडून सामूहिक टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न

Continues below advertisement
कोल्हापूरमधील (Kolhapur) महिला सुधारगृहात सहा नृत्यांगनांनी (Dancers) सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. जामीन मिळत नसल्याने नैराश्यातून या नृत्यांगनांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका रिसॉर्टवर अनधिकृतपणे नृत्य आणि वेश्याव्यवसाय केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी या महिलांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून त्या महिला सुधारगृहात होत्या. सुटकेसाठी त्यांनी वारंवार जामीन अर्ज केले होते, पण प्रत्येक वेळी तो फेटाळण्यात आला. अखेर नैराश्येतून या सहा जणींनी हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तातडीने सर्वांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola