देशातील परिस्थिती पाहता तूर्त मास्कमुक्ती शक्य नसल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी केलयं
देशातील परिस्थिती पाहता तूर्त मास्कमुक्ती शक्य नसल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. तसं गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे गुढीपाडव्याला मिरवणुकांना परवानगी मिळणार का याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. असं असलं तरी मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणालेत पाहुयात....