गृहमंत्री असताना देशमुखांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी यादी पाठवल्याची कुंटेंची ईडीला माहिती- सूत्र
Continues below advertisement
शंभर कोटी वसुलीच्या आरोपांमुळे वादात सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी यादी पाठवल्याची माहिती कुंटे यांनी ईडीला दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. कुंटे यांच्या या गौप्यस्फोटामुळे देशमुख यांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement