Gauri Lankesh Murder | ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला बेड्या | ABP Majha

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला अखेर अटक करण्यात आली. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातल्या कतरास इथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा आहे. तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्येप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola