Sion Dharavi Connector Bridge लवकरच पाडणार, मुंबईकरांच्या डोक्याचा ताप पुन्हा वाढणार

Continues below advertisement

Sion Dharavi Connector Bridge लवकरच पाडणार, मुंबईकरांच्या डोक्याचा ताप पुन्हा वाढणार

मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी. मुंबईकरांना पुन्हा एका पूलबंदीचा सामना करावा लागणार आहे. सायन धारावी वांद्रे माहिम या परिसरांना जोडणारा सायन रेल्वे स्थानकावरचा ११० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल लवकरच पाडला जाणार आहे. रेल्वेकडून पाचव्या आणि  सहाव्या मार्गिकेच्या कामाकरता सध्याचा पूल पाडून नवा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. मध्य रेल्वे पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेवरील पुलाची पुनर्बांधणी करणार असून, त्यासाठी सायन-धारावीचा हा पूल पाडण्यात येईल. मुंबई महापालिकेनं माहिमच्या मखदूम शाह बाबा दर्ग्याचा उरुस संपल्यानंतर म्हणजे चार जानेवारीनंतर हा पुल बंद करण्याची मध्य रेल्वेला परवानगी दिली आहे. पण माहिमचा उरुस संपल्यावर नेमक्या कोणत्या दिवशी पूल बंद करायचा याचा निर्णय मध्य रेल्वेन घेतलेला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram