मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यासह 18 महापालिकांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका
Continues below advertisement
महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि त्याचवेळी निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे तिथली राजकीय गणितं बदलण्याची चिन्हं आहेत. कारण या निवडणुका आता एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होतील असं जवळजवळ निश्चित झालंय. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे २०२२ च्या महापालिका निवडणुका बहुसदस्यीय ऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी निवडणूक होणार असलेल्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह १८ महापालिकेच्या निवडणुकीसाठी आराखडा तयार करण्याचे आदेश आयोगानं दिलेत.
Continues below advertisement
Tags :
Maha Vikas Aghadi Bmc Municipal Corporation Election Pmc Single-member Wards Maharashtra Civic Bodies