Sindhudur Elephant Chasing| सिंधुदुर्गात हत्तीकडून तिघांचा पाठलाग,पुलाच्या पाईपमध्ये लपल्याने बचावले
Continues below advertisement
तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात रात्री हत्तीचा थरार गावातील तीन व्यक्तींनी अनुभवला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भेकुर्ली गावातून मोर्ले गावात घरी जात असताना दुचाकीची लाईट फणसाच्या झाडाखाली फणस खात असलेल्या तस्कर हत्तीच्या डोळ्यावर पडली आणि त्याने पाठलाग सुरु केला. हत्ती पाठलाग करतोय हे समजताच. त्या तिघांनीही दुचाकी तिथेच टाकत पळायला सुरुवात केली. तस्कर हत्तीने पाठलाग केल्यामुळे हत्तीपासून वाचण्यासाठी जवळच रस्त्याचा पूल होता. या पुलाला सिमेंटचा पाईप होता. त्या तिघांनी या पाईपमध्ये रात्री दहा वाजल्यापासून सुमारे तीन तास बसून काढले. साधारणपणे अर्धा तास हत्ती त्या पाईपमध्ये सोंड घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय मध्येच ओरडत सुद्धा होता.
Continues below advertisement