Sindhudurga: सिधुदुर्ग बॅंक अध्यक्षपदी भजपचे मनीष दळवी ABP Majha
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी (manish dalvi) यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी भाजपचेच अतुल काळसेकर (Atul Kalsekar) विजयी झाले. नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी हे नारायण राणे (Narayan Rane) यांचे निकटवर्तीय मानले जातात. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं आहे.
Continues below advertisement