Sindhudurg :अटकपूर्व जामीनासाठी Nitesh Rane यांची न्यायालयात धाव, आज दुपारी सुनावणी ABP Majha

Continues below advertisement

संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतलेय. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आलेय. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना ऍड संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. तर ऍड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत ही कायदेतज्ञ टीम सहकार्याला असेल. विशेष सरकारी वकील म्हणून ऍड प्रदीप घरत आणि ऍड भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे ते युक्तिवाद करतील. आज दुपारी २.४५ वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होईल. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्यानं चर्चांना आणखी उधाण आलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram