Sindhudurg Kudal : कुडाळ नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजपचा सामना

प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान होतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिलाय. आमदार वैभव नाईक यांनी याबाबत घोषणा केलीय. तर दोडामार्गमध्ये १३ नगरसेवकांचं स्पष्ट बहुमत असताना भाजप विरुद्ध भाजप अशी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी २ भाजप तर दोन महाविकास आघाडीकडे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ताब्यात असलेल्या नगर पंचायती राखण्यात नारायण राणे यशस्वी होणार? की देवगड मागोमाग प्रतिष्ठेचे कुडाळ पुन्हा एकदा हातून जाणार? याकडं लक्ष लागलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola