Sindhudurg foreign Women Case : सिंधुदुर्गातल्या जंगलात विदेशी महिला साखळदंड बांधलेल्या अवस्थेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSindhudurg foreign Women Case : सिंधुदुर्गातल्या जंगलात विदेशी महिला साखळदंड बांधलेल्या अवस्थेत
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली - रोणापाल या गावांच्या सीमेवर घनदाट जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात रात्री उशिरा बांदा पोलीस ठाण्यात कलम-109, 125, 127-2, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिचा पती सतीश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासासाठी गेली असून त्यानंतर सत्यता समोर येणार आहे. त्या महिलेला कधी व का बांधण्यात आली हे पतीला ताब्यात घेतल्यानंतर उलगडणार आहे. सध्या सिंधुदुर्ग पोलीसांनी घटनास्थळी जात पुन्हा तपासणी केली, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी...