Sindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूस

Continues below advertisement

Sindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूस

 तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात जंगली हत्तींच्या कळपाकडून फळपिकाची नासधूस सूरू आहे. तर पाळये गावात भरवस्ती जवळ येऊन हत्तीच्या कळपाने माड बागायतीचे आणि केळी पिकाची नासधूस केली आहे. पाळये गावातील शेतकरी गणेश शिरसाट यांच्या घरालगत असलेल्या नारळाच्या झाडांना जंगली हत्तीनी जमीन दोस्त केलं आहे. दिवसाढवळ्या हत्ती लोकवस्ती जवळ येऊन नासधूस करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाकडून मात्र बघ्याची भुमिका घेतली जात आहे. त्यामुळे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये रोष असून या हत्तीचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सिंधुदुर्गच्या पाळये गावात जंगली हत्तीच्या कळपाकडून माड बागायत आणि केळी पिकांची नासधूस, वनविभाग बघ्याची भुमिका घेत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये रोष.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram