Alphonso Mango | क्यार वादळ, अवकाळी पावसाचा हापूसचा हंगाम लांबणीवर, आफ्रिकेचा आंबा बाजारात | ABP Majha

Continues below advertisement
क्यार चक्रीवादळाचा फटका फळांचाराजा हापूस आंब्यालाही बसला आहे. कारण हापूसचा हंगाम तब्बल 40 दिवस लांबणार आहे. हवामानात झालेला मोठा बदल हापूससाठी मारक ठरत आहे. हवेतील आर्द्रता आणि जमिनीतील पाण्याचं प्रमाण यामुळे आंब्याला पुन्हा पालवी फुटत आहे. त्याला करपा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळेल औषध फवारणीचा आर्थिक भुर्दंड आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं सोसावा लागत आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या बाजारात थेत आफ्रिकेतील हापूस आंबा दाखल झाला आहे. आफ्रिका खंडातील मालावी देशातील एका उद्योजकाने मालावी मँगोज ही कंपनी स्थापन केलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram