Anganewadi Jatra | मुख्यमंत्र्यांनी घेतलं आंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन | ABP Majha
Continues below advertisement
कोकणातल्या प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन रांगा खुल्या होताच भाविकांनी गर्दी केलीय. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून यंदा ९ विशेष रांगांची व्यवस्था करण्यात आलीय. सर्वसामान्यांसह राजकीय नेतेमंडळीही दरवर्षीप्रमाणे भराडीदेवीच्या चरणी नतमस्तक होत असल्याचं पाहायला मिळतंय. कोकण दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भराडी देवाचं दर्शन घेतलं. याशिवाय भाजप नेते आशिष शेलार, विनोद तावडे, नितेश राणे हे सुद्धा देवीचरण नतमस्तक झाले
Continues below advertisement