Sindhudurg : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदाराचा 321 वर्षापासून बसणारा खवळे गणपती #Ganeshotsav

Continues below advertisement

#ABPMajha सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवळे कुटुंबीयांचा गणपती कोकणात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. 321 वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव तब्बल 21 दिवस तीन रुपात साकारला जातो. विशेष म्हणजे विसर्जनाच्या दिवशी या गणपतीसमोर खवळे कुटुंबीयांच्या पूर्वजांना पिंडदानही केले जाते. पिंडदान होण्याची प्रथा असलेला हा एकमेव गणपती आहे. तसेच या गणपतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड‌्समध्ये नोंद झाली आहे. देवगड मधील तारामुंबरी गावातील खवळे कुटुंबात गेली 321 वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram