Sindhudurg : सिंधुदुर्गात अश्मयुगीन कातशिल्प आढळलं, सिंधुदुर्गात आदिमानवाच्या पाऊलखुणा ABP Majha
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात आणि पुरातत्व वैभवात कातळशिल्पाची भर पडली आहे. मालवण मधील खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचं मत कातळशिल्प अभ्यासकांनी व्यक्त केलंय. चिरेखाणींमुळे ही कातळशिल्पं नष्ट होण्याची चिंता कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी व्यक्त केलीय..
Continues below advertisement
Tags :
Sindhudurg Nomadic Tribe Fossils Carvings Found In Sindhudurg Footprints Of Primitive Man In Sindhudurg