Silver Rate Hike : सोन्या पाठोपाठ चांदीही महागली, दर 65 हजारांवरुन थेट 70 हजारांवर ABP Majha
Continues below advertisement
खामगावात चांदीचे भाव वाढले , 65 हजाराहून चांदीचे भाव झालेत 70,200 रु प्रतिकिलो दिवसेंदिवस सोन्याच्या भावात वाढ होत असताना आता चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याच दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी म्हणून असलेल्याव व देशातील चांदीची मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव शहरात चांदीचे भावात मोठी वाढ झाल्याच व्यापारी सांगत असून चांदीचा कालचा भाव प्रतिकिलो 70,200 इतका झाला आहे , गेल्या महिन्यात हाच भाव जवळपास 63 ते 64 हजार रु प्रतिकिलो च्या घरात असताना मात्र आता अचानक भाववाढ झाली आहे. याची वेगवेगळी कारणे व्यापारी सांगत आहेत , जगभरात कोरोना संकटाने पुन्हा आगमन केल्याने ढासळलेला शेअर बाजार हे प्रमुख कारण मानल्या जात आहे.
Continues below advertisement