Silver Price Update : चांदीच्या दरात 12 दिवसांत प्रति किलो 6 हजारांची घट, खरेदीसाठी मोठी गर्दी

Continues below advertisement

गेल्या महिन्यात तेजीत असलेले चांदीचे भाव या महिन्यात मात्र कमी होताना दिसत आहे. आखाती देशातील युद्धाचे ढग आणि जागतिक बाजारपेठेत चांदीच्या मागणीला असलेली मंदी या कारणांमुळे गेल्या महिन्यात ८६ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी या महिन्यात ८० ते ८० हजार ५०० रुपये प्रति किलो घसरली आहे. बारा दिवसात चांदीच्या दरात ६ हजार रुपये प्रति किलो इतकी घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या दिवसात चांदी खरेदी करण्यासाठी बुलढाण्यातील खामगाव इथल्या चांदीच्या बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram