Karnataka Siddaramaiah: 2023 मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक लढवणार- सिद्धारमैय्या ABP Majha

कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते सिद्धारमैया यांनी  शुक्रवारी मोठी घोषणा केलीय. २०२३ ची विधानसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल असे सिद्धारमैया यांनी म्हटलेय. तसेच या निवडणुकीनंतर मी राजकारणात सक्रिय असेन पण निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.  आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढायची ते अजून ठरलेले नाही. विधानसभा निवडणुकीत पक्ष मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा निवडेल त्यासाठी काम करणार असेही सिद्धारमैया यांनी यावेळी सांगितलेय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola