Shyam Manav : 'संविधान बचाव महाराष्ट्र बचाव अभियान राबवणार' :शाम मानव
Shyam Manav : 'संविधान बचाव महाराष्ट्र बचाव अभियान राबवणार' :शाम मानव
"संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा" असं अभियान राबवून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व पुरोगामी संघटना विधानसभा निवडणुका बद्दल ठोस भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत आहे... श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज यासंदर्भात नागपूरातील विनोबा विचार केंद्रात महाराष्ट्रातील विविध सामाजिक व पुरोगामी संघटनांची एक प्राथमिक बैठक बोलावली आहे... संविधानातील मूल्ये पायदळी तुडवून संविधान धोक्यात आणलं जात आहे, हे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीही आम्हाला जाणवलं होतं... म्हणूनच लोकसभा निवडणुकीत विदर्भात 36 छोट्या सभा घेतल्या.. त्यामधून चांगले परिणाम येऊन आपणही मोदीला पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास छोट्या-छोट्या संघटनांमध्ये निर्माण झाला... म्हणूनच विधानसभेसाठी निश्चित भूमिका घेण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आजची बैठक होणार असल्याचे श्याम मानव म्हणाले... निवडणुकांचा निकाल आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, तो आमचा उद्दिष्टही नाही... मात्र संविधान वाचवला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून "संविधान बचाव महाराष्ट्र बचाव" असा अभियान आम्ही राबवणार आहोत असेही श्याम मानव म्हणाले.