Shubhanshu Shukla Returns: अंतराळवारीनंतर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले Special Report

Continues below advertisement
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला वीस दिवसांच्या अंतराळवारीनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले. शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्सचं ड्रॅगन कॅप्सूल अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात उतरले. शुभांशु शुक्ला हे राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले. तसेच, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (ISS) पोहोचणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांनी अवकाश स्थानकात सतरा दिवस वास्तव्य केले. या काळात शुभांशु शुक्ला यांनी साठपेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग केले, ज्यात भारतातील सात प्रयोगांचा समावेश होता. त्यांनी हाडांच्या आरोग्याविषयी अभ्यास केला. 28 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला आणि तिरुअनंतपुरम, बंगळूरू, लखनऊ येथील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 6 जुलैला इस्रोमधील शास्त्रज्ञांशी गगनयान मोहिमेविषयी चर्चा केली. शुभांशु शुक्ला यांनी आयएसएसच्या क्युपोला मॉड्यूलमधून पृथ्वीची अद्भुत फोटोग्राफीही केली. शुभांशु यांची ही मोहीम आगामी गगनयान मोहिमेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या मोहिमेमुळे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला नवी उंची मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola