Shruti Sharma UPSC Topper : युपीएससीत यंदा मुलींची बाजी, श्रुती शर्मा देशात अव्वल ABP Majha
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल आज जाहीर झालाय...यंदा यूपीएससीत यंदा मुलींनी बाजी मारलीय.. श्रुती शर्मा हिने या परीक्षेत देशभरातून पहिला रँक मिळवला आहे.पहिले चारही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. अंकिता अग्रवाल दुसरी, गामिनी सिंगला तिसरी आणि ऐश्वर्या शर्मा देशात चौथी आलीय.. दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रियंवदा म्हाडदळकर हिने देशात 13 वा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रियंवदा मुळच्या रत्नागिरीच्या असून त्यांचं शिक्षण मुंबईत झालं आहे.